केंदूर ता. शिरुर सह करंदी येथील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याने येथील शालेय गरजू मुलांना मदतीचा हात मिळाला आहे. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

                               केंदूर ता. शिरुर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व करंदी येथील विद्या विकास मंदिर या शाळेतील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून नुकतेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी करंदी गावच्या पोलीस पाटील वंदना साबळे, डॉ. नितीन सोनवणे, प्राचार्य रणजित गावित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, अनिल साकोरे, चंद्रकांत थिटे, संजय जोहरे, मोतीराम वागतकर, मनोज दोंड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, करंदीचे प्राचार्य दत्तात्रय बनसोडे, डॉ. प्रतिक पलांडे यांसह आदी उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या केंदूर गावात आदिवासी ठाकर समाजातील खूप मोठ्या प्रमाणात कुटूंब वास्तव्यास असून येथील सर्व मुले केंदूर येथील शाळेत शिक्षण घेतात, मात्र सदर मुलांना अनेक शैक्षणिक अडचणी येत असल्याने स्वरूपाची मदत मिळाल्याने या मुलांना खूप मोठा आधार मिळत असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धस यांनी केले तर चंद्रकांत थिटे यांनी आभार मानले.