चिमूर क्रांती भूमीतील अमर शहिदांना अभ्यंकर मैदान शहीद स्मारक तथा हुतात्मा स्मारक येथील शहीद बालाजी रायपूरकर तसेच लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना माजी. मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि माजी. आमदार तथा प्रदेशमहासचिव नामदेवराव उसेंडी यांनी क्रांतीविरांना वाहिली श्रध्दाजंली

चिमुर :-दि.17 ऑग्सट:-  9 ऑगस्ट 1942 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजाविरोधात ‘चले जाव‘ चा नारा दिला. या ना-याने प्रभावित होवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'झाड झडूले शस्त्र बनेंगे , भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बाॅंम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे' अशाप्रकारचे क्रांतीगीत गावून क्रांतीला प्रेरणा देणारे गीत गायल्याने चिमुर, आष्टी, यावली, बेनोडा येथील स्वांतंत्र्य सेंनानींना प्रेरीत होवून चिमुर येथे 16 ऑगस्ट 1942 ला नागपंचमीच्या दिवशी तिरंगा फडकविण्यासाठी म्हणून आंदोलन केले. या आंदोलनामध्ये असंख्य स्वांतंत्र्य सेंनानी सहभागी झालेले होते. या आंदोलनावर इंग्रज पोलीसामार्फत गोळीबार केल्यामुळे 14 वर्षाचे बालाजी रायपूरकर हे तरुण शहिद झाले. व असंख्य स्वांतंत्र्य सेंनानीं जखमी झाले या शहिदांची आठवण म्हणुन तत्कालीन चिमुरचे आमदार आदरणीय मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चिमुर येथील किल्यावर शहीद स्मारकाची उभारणी केलेली आहे. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा, स्वांतंत्र्य सेंनानीं बालाजी रायपूरकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांची सुध्दा स्मारक उभारलेले आहे. दरवर्षी 16 ऑगस्ट ला शहिदांना अभिवादन करण्यात येत असते. यावर्षी सुध्दा 16 ऑगस्ट ला माजी मंत्री आदरणीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव उसेंडी, प्रदेश ओबीसी सेल संघटक धनराज मुंगले, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी जि.प. सदस्य गजानन बुटके, माजी संचालक सि.डी.सी.बॅंक संजयभाउ डोंगरे, सरचिटणीस ओबीस सेल राजू लोणारे,ज्येष्ठ नेते भीमरावजी ठवरे, माजी सभापती किशोर शिंगरे, माजी सभापती प्रफुल खापर्डे, नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही स्वप्निल कावडे, ज्येष्ठ नेते कृष्णाजी तपासे, माजी अध्यक्ष युवक काँग्रेस संदीप कावरे, माजी नगरसेवक उमेश हिंगे, माजी नगरसेवक तुषार शिंदे,कल्पनाताई इंदुरीकर ,नितीन भाऊ कटारे,राजू हिंगणकर,शंकर भाऊ माहुरे ,राजूभाऊ दांडेकर, प्रमोद दांडेकर, ,प्रशांत भाऊ ढवळे, सुधीर पोहनकर सर,मनीष नंदेश्वर, सुधीर भाऊ पंदीलवार, यशवंत भाऊ वाघे,जावा भाई, विलास भाऊ डांगे,प्रदीप भाऊ तळवेकर ,निखिल डोईजड ,रीता अंबादे, पारस भाऊ नागरे, सोनू भाऊ कटारे ,मुरलीधर जी निमजे, नाना नंदनवार, शम्मी शेख ,तुळशीरामजी बनसोड ,किसन कुंमले, चंद्रशेखर गिरडे ,राकेश भाऊ साठवणे ,श्रीकृष्णा झिलारे ,अंकुश मेहरकुरे ,बंटी शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील मंडळी उपस्थित होते .