पिंपळे जगताप ता. शिरुर येथील आयडीबीआय बँकेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बँकेमध्ये प्रवेश करुन करत बँकेतील केबिन व लॉकरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                               पिंपळे जगताप ता. शिरुर येथील ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीत आयडीबीआय बँक असून २२ जुलै रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँक बंद करून घरी गेले होते दोन दिवस सुट्टी असल्याने २४ जुलै रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँकेत आले असता त्यांना बँकेच्या मुख्य शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले यावेळी त्यांनी बँकेमध्ये आतमध्ये जाऊन प्रवेश करत पाहणी केली असता बँकेच्या अधिकाऱ्याची केबिन तसेच बँकेचे लॉकर देखील चोरट्यांनी फोडले असल्याचे दिसून आले, त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले तर चोरट्यांचा चोरीचा डाव देखील फसल्याचे दिसून आले, याबाबत नितीनकुमार जगन्नाथ लगाडे वय ४२ रा. देहू रोड बापदेव नगर हाउसिंग सोसायटी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.