धर्माबाद सबंध भारत देशात स्वातंत्र्याच्या ७५ निमित्त देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्याच धर्तीवर धर्माबाद शहर व तालुक्यात निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीतही अगदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी नगर परिषद, पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्याने प्रभातफेरीतील निघालेल्या
महापुरुषांचे वेश परिधान केलेली चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. तर विज्डम डिजी कॉन्सेप्ट स्कूलच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने विविध कलागुणांचा आविष्कार करत सर्वांची मने जिंकली. शहरातील प्रत्येक चौकात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतावरील नृत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून नवी ऊर्जा दिली.