वाघोली येथील बीजेएस शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षण घेत असलेल्या अनाथ, आदिवासी, भूकंपग्रस्त मुलामुलींचे रक्षाबंधन व स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आई प्रतिष्ठाणच्या वतीने साजरा करण्यात आला. हा उपक्रम गेली १९ वर्षांपासून आई प्रतिष्ठाण राबवत आहे.

      यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आई प्रतिष्ठाणच्या वतीने मुलांना राख्या बांधून मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी वाघोली येथील आई प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, बीजेएसचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.