परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने वाघोलीतील प्राध्यापकास रजिस्ट्रेशन फी, व्हेरिफिकेशन, आयडेनटीटी चेक आदी कारणे देऊन नोकरी न लावता ४६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील नामांकित कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या ४६ वर्षीय प्राध्यापकास कोलकाता येथील कन्सलटंसीतून फोन करून परदेशात नोकरी लावण्यासाठी फोन केला व रजिस्ट्रेशनफी भरण्यास सांगितले. प्राध्यापकांनी फी भरल्यानंतर ऑनलाईन इंटरव्ह्यू घेऊन व्हेरिफिकेशन, आयडेनटीटी चेकच्या बहाण्याने ४१ हजार रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे भरल्यानंतरही आणखी ४२ हजार रुपये भरण्यात सांगण्यात आल्याने प्राध्यापकास शंका येऊन आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच पुणे शहर सायबर पोलिसात तक्रार देऊन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.