वैजापूर :-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वैजापूर शहरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वसंत क्लब वैजापूरतर्फे आज गौरव करण्यात आला. 

क्लबच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा क्लबचे अध्यक्ष माणिक आहेर होते. आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी पुढील ध्येय निश्चित करून प्रयत्नांची 

पराकाष्ठा करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थिनी प्रतिक्षा चन्ने व माया साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या प्रसंगी क्लब चे उपाध्यक्ष डॉ. व्ही.जी, शिंदे, सचीव जफर ए.खान, सहसचिव डॉ.संतोष गंगवाल, घनश्याम वाणी, बिलाल सौदागर, रहिम खान, पारस घाटे, महेश बुनगे, वसंतराव कदम यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.