राजापूर : येथील कृषि पदवीधर व पदविकाधारक संघ, कृषी विभाग पंचायत समिती व ग्रामपंचायत भूम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार यांना मार्गदर्शन करण्यासाठी पूणे येथील ज्येष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे ग्रामपंचायत हे भूम येथे आज सकाळी ११ वाजता मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा व काजूच्या बागायती आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून या बागेमध्ये खोडकिडा, फळमाशी, तुडतुडा, वाळवी यांसारख्या किटकांनी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व किटकांवर नियंत्रणाकरिता जैविक कीडनाशकांचा चांगला उपयोग होतो. या जैविक कीडनाशकाचा शोध लावणारे पूणे येथील ज्येष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. राहुल हे मराठे ग्रामपंचायत भूम येथे आज १ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी व बागायतदारांनी या कार्यशाळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.