कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व श्रीमती सुभद्राबाई जुनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे (राष्ट्रीय सेवा संघ व विद्यार्थी विकास मंडळ) प्रभात फेरी, पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वाघोली येथे वाघेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले. त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

          सदर कार्यक्रमांदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीवर घोषणा दिल्या आणि तसेच वाघोली व बी. जे. एस. परिसरात झेंड्याचे वाटप करण्यात आले. श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती भूमकर तसेच श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश देसाई, सुभद्राबाई जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. दिलीप धंगेकर सर्व विभाग प्रमुख व इतर प्राध्यापकांनी आपली उपस्थिती दर्शिविली