शिरुर दिनांक ( वार्ताहर ) जीवनात चारित्र्य संवर्धन व मूल्य शिक्षण महत्वाचे असून महिलांचा सन्मान व शिक्षकांचा सन्मान करणे ही आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत उत्तीर्ण झालेले अक्षय घावटे यांनी सांगितले . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत ३५ वी रॅक मिळवत यशस्वी झालेले अक्षय महादेव घावटे , पोलीस म्हणून निवड झालेले मयूर भापकर , अमोल ओव्हाळ , विकास धोत्रे , राहूल क-हे , विलास विधाते ,सूरज दुर्गे यांचा विशेष सन्मान ज्ञानगंगा विश्व विद्यालय यांचा वतीने करण्यात आला . यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . प्रा राजेराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे , डॉ.आखिलेश राजूरकर , सोसायटीचे विश्वस्त सुधीर शिंदे , अमृतेश्वरी घावटे , सीईओ  प्रा .डॉ नितीन घावटे , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही .डी .शिंदे , मुख्याध्यापक संतोष येवले ,जयश्री लंघे , महादेव घावटे , सविता घावटे , आदी यावेळी उपस्थित होते . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले अक्षय घावटे म्हणाले की माझे शिक्षण जिल्हा परिषदेचा शाळेतून झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशालेत पूर्ण केले .नंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल . माझी पार्श्वभूमी ग्रामीण भागाची असून माझे वडिल शेतकरी होते .ते तीसरी इयत्ता शिकलेले असून आईचे शिक्षण सहावी पर्यत झाले होते एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात आमच्या जन्म झाला माझे एक बंधु एम. डी मेडिसन असून बहिण ही तहसिलदार म्हणुन काम करतात असे सांगून ते म्हणाले की कोणतीही पदवी घ्या पण या पदवीचे शिक्षण घ्याल ते गंभीरपणे घ्या . चारित्र्य संवर्धन ,शिक्षकाचा सन्मान , महिलांचा सन्मान व नैतिक मूल्ये हे महत्वाचे आहे . मिळालेल्या ज्ञानाचा दैंनदिन जीवनात प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले . अभ्यासाकरीता नियोजन महत्वाचे आहे .ज्ञानाला कोणतेही भाषा नसते. मी मातृभाषेतून माझे शिक्षण झालेले आहे . सनदी आधिकारी डॉ आय्याज तांबोळी यांचापासून आपण स्पर्धा परीक्षे देण्याची प्रेरणा घेतली असल्याचे ते म्हणाले . त्याच बरोबर मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले की अभ्यासात सातत्य व मेहनत घेतली कोणतेही यश सहज मिळत नाही . यशासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे. प्रा .डॉ राजेराम घावटे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी गंगा एज्युकेशन सोसायटीचा वतीने राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खणसे यांनी केले .