फुलंब्री विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आज दि 16 रोजी हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे घेण्यात आला

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

फुलंब्री औरंगाबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस उद्या होता, मात्र विधानसभेचे अधिवेशन असल्याने आज रोजी फुलंब्री भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला,यावेळी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड,माजी आरोग्य मंत्री नामदेव गाडेकर,भाजपा तालुकाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ,महिला बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण यांच्या यांच्या हस्ते देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समूर्ती दिन असल्याने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,यावेळी आमदार हरिभाऊ बागडे,व अर्थमंत्री भागवत कराड यांचा अनुराधाताई चव्हाण यांनी औक्षण केले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याच प्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने आमदार हरिभाऊ बागडे यांचा पुष्पहार घालून त्यांना शुभेछ्या देण्यात आल्या.

प्रसंगी माजी मंत्री नामदेव गाडेकर,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, गोपाळ वाघ, महिला तालुका अध्यक्ष एशवऱ्या गाडेकर, माजी सभापती सविताताई फुके,कृष्णा गावंडे, फारुख शेख, योगेश मिसाळ, अजिनाथ धामणे, राम बनसोड,सांडू जाधव, वाल्मिक जाधव, रामेश्वर चोपडे, नाथा अप्पा काकडे, एकनाथ धटिंग, आप्पासाहेब काकडे, यांची प्रमुख उपस्थित होते.या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार हरिभाऊ बागडे,अर्थमंत्री भागवत कराड,व अनुराधाताई चव्हाण यांचा ग्रंथतुला करण्यात आला, फुलंब्री तालुक्यातील नवनिर्वाचित सोसायटी संचालकांचा सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे तालुक्यातील 11 अनाथ मुलींना प्रत्येकी अकरा हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला,

यावेळी प्रभाकर सोटम,नरेंद्र देशमुख, एकनाथ ढोके, गजानन नागरे, बाळासाहेब सोटम, जनार्धन शेजवळ, राजेंद्र वाघ, शेखर पालकर, बाबासाहेब शिनगारे,संतोष जाधव,संतोष तांदळे,मनोहर सोनवणे,यांच्या सह भारत्तीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.