बीड ( प्रतिनिधी ) शहरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेत संस्थेचे सन्माननीय सचिव श्री उत्तम पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार सर म्हणाले की , भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत एक भुके कंगाल देश होता . परंतु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशिया प्रमाणेच आपल्या भारतात मिश्र अर्थव्यवस्था निर्माण केली . पहिल्या पंचवार्षिक योजने पासूनच त्यांनी अवजड उद्योग व कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले . म्हणून आज औद्योगिक क्षेत्राबरोबरच अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. हे पंतप्रधान नेहरूंनी अवलंबलेल्या पायाभूत सुविधांचे फलित आहे . आजचा विद्यार्थी हा उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधण्याबरोबरच राष्ट्राचीही प्रगती साधावी . म्हणजे देश महासत्ता बनण्यास फार वेळ लागणार नाही .असा उपदेश श्री पवार सर यांनी विद्यार्थ्यांना केला. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली . राष्ट्रपुरुषांची व क्रांतिकारकांची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे उमटणारे भाषणे केली त्यामुळे संपूर्ण परिसराला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप आले होते. विद्यार्थ्यांच्या तोंडातून निघणारे क्रांतिकारकांचे भारतमाते बद्दलचे विचार ऐकून उपस्थितांचे डोळे पाणवले.शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास मुख्याध्यापक प्रशांत पवार , डॉ.नंदकुमार उघाडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते