शिरुर दिनांक (वार्ताहर) बोली भाषेचा उपयोग संतानी त्यांच्या अभंगात व भजनात करुन लोकप्रबोधन केले असून बोली भाषेच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घेवून बोली भाषेचे सच्चे दूत म्हणुन काम करावे असे आवाहन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर) यांनी केले . चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शिरुर यांच्या सहकार्याने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर) यांचे ' झाडी बोली, साहित्य आणि संस्कृती' या विषयांवर व्याख्यान झाले . बोढेकर यांनी झाडी बोलीतील विविध शब्द , गीते कविता व कथा कांदबरी यांची माहित देत झाडी बोलीतील विविध शब्द अर्थासह सांगितले . त्याच बरोबर काही कविता ही सादर केला . बोली भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले . यावेळी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी प्रास्ताविक केले . प्रा . डॉ .भोईटे , साहित्य परिषद शाखा शिरुरच्या कार्याध्यक्षा डॉ .प्रा . क्रांती पैठणकर ( गोसावी ) उपाध्यक्ष प्रा . सतीश धुमाळ प्राध्यापिका बांगर आदी यावेळी उपस्थित होते.