शिरुर दिनांक ( वार्ताहर ) ध्यानधारणा केल्यानंतर एकाग्रता वाढीस लागते . ध्यानधारणा नियमितपणे करण्याचा संकल्प करुन जीवनात सकारात्मक बदल घडवावेत असे आवाहन ध्यानधारणा व योग मार्गदर्शिका शिक्षीका विद्या सोळसे ( वाघमारे) यांनी केले . तेजज्ञान फाउंडैशनला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोळसे यांनी शिरुर मधील ज्ञानगंगा विश्व विद्यालय , व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर , डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कुल शिरुर , बालाजी विश्व विद्यालय मध्ये ध्यानधारणा संदर्भात व्याख्यान दिले व ध्यानधारणा कसे करावे याचे मार्गदर्शन केले . यावेळी ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरुरचे मुख्याध्यापक संतोष येवले , उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक व्ही . डी. शिंदे , श्याम शेटे , व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख विकास पोखरणा , मुख्याध्यापिका पसक्कीन कासी , शितल जाधव , बालाजी विश्व विद्यालयचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , उपमुख्याध्यापक स्वाती चत्तर , मुख्याध्यापिका स्वाती थोरात , प्राचार्य डॉ . समीर ओंकार प्रा . सतीश धुमाळ आदी उपस्थित होते . सोळसे म्हणाल्या की लॉकडाउन नंतर विद्यार्थ्यानाचा मोबाईलचा वापर वाढला आहे . ताण तणावास सामोरे जाण्याची शक्ती तुमची ध्यानधारणेमुळे वाढते . चांगल्या सवयी रुजविण्यासाठी मनाचा निग्रह महत्वाचा आहे .ध्यानधारणा कसे करावे . त्यातील अडथळे त्यावर मात करण्याचे मार्ग व ध्यानधारणेचे महत्व त्यांनी समजावून सांगितले .