शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर नाभिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे . शिरूर शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी सनी राजेंद्र थोरात यांची निवड करण्यात आली आहे . संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब क्षीरसागर आहेत . संघटनेच्या उपाध्यक्ष पदी तेजस बाळासाहेब गायकवाड यांची तर कार्याध्यक्षपदी वैभव बबन रायकर , सचिवपदी संतोष कानिफनाथ गायकवाड , खजिनदारपदी संतोष सुरेंद्र वाघमारे यांची तर उपकार्याध्यक्षपदी विशाल दिपक जाधव यांची निवड झाली आहे . सल्लागार मंडळात रणजित पांडुरंग गायकवाड ,गणेश गंगाराम शिंदे, बाळासाहेब तुकाराम गायकवाड , गोरख हरिभाऊ गायकवाड ,शामराव बबनराव राऊत,विलास वसंत रायकर, हेमंत भाऊसाहेब क्षिरसागर मयुर राजेंद्र थोरात, निलेश मोहन भोसले, बाबा जाधव , विठ्ठल देव्हाडे , सोमनाथ देव्हाडे ,अब्बास शेख , एकनाथ गायकवाड , राजेंद्र कोंडिंबा आतकर आदी  कार्यरत आहे .