शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदच्या वतीने विसर्जन  घाटावर उभारण्यात आलेल्या मुर्तीदान कक्षात गणेश विसर्जनाचा दिवशी ५०६ गणेशमुर्त्यांचे संकलन झाले. त्याच बरोबर घाटावर ७०० किलो निर्माल्य गोळा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली . आयपीएस आधिकारी सुप्रिया साकोरे , शिरुर वकिल संघटना गणेश मंडळ ,शिरुर नगरपरिषद सेंटर शाळा व अनेक नागरिकांनी गणेश मुर्ती मूर्तीदान कक्षात दिल्या .

  काळे यांनी सांगितले की गणेश विसर्जनाकरीता शनिमंदिर विसर्जन घाट , दशक्रिया विधी घाट , रयत शाळेचे मैदानावरील कृत्रिम विसर्जन कुंभ या तीन ठिकाणी गणेश मुर्तीचे विसर्जन करणे करीता सोय करण्यात आली होती .पर्यावरण अनुकुल गणपती विर्सजन होणेसाठी व इतर सर्व कामासाठी नगरपरिषदे मार्फत टिमची नियुक्ती करण्यात आलेली होती त्याच बरोबर नगरपरिषदेव्दारे विविध माध्यामाव्दारे मुर्तीदान करणेबाबत आवाहन करण्यात आले होते . विसर्जन स्थळी मुर्तीदान कक्षाची स्थापना करण्यात आली होती .. ज्या नागरिकांनी मुर्तीदान केले त्या नागरिकांना परिषदे मार्फत पर्यावरणदुत पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले .मुर्तिदान या उपक्रमा करीता वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या सुनंदा लंघे , उषा वाखारे यांचे विशेष सहकार्य मिळाले .