शिरुर दिनांक ( वार्ताहर ) संगणकाचा वापर आपल्या जीवनात करुन जीवन अधिकाधिक यशस्वी करा असे आवाहन ज्येष्ठ्य व्यापारी मिश्रीलाल दरडा यांनी केले . येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालय बाबूराव नगर शिरुर या संस्थेस १० संगणक दरडा परीवाराचा वतीने भेट देण्यात आले . यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ . राजेराम घावटे , संचलिका अमृतेश्वरी घावटे ,सीईओ डॉ . नितीन घावटे , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक शिंदे, मुख्याध्यापक संतोष येवले , मुख्याध्यापिका सुनंदा लंघे , आदी यावेळी उपस्थित होते . डॉ . घावटे म्हणाले की हाती घेतलेले काम तडीस न्या व उत्सहाने सर्व कामे करा . १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदनाचा निमित्ताने व्यवसायिक धन्यकुमार दरडा शाळेत आले असताना संस्थेस १० संगणक देण्याचे जाहीर केले होते . त्यानुसार आज हे संगणक संस्थे कडे सुपूर्त करण्यात आले . यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे यांनी केले . आभार संतोष येवले यांनी मानले