शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदच्या वतीने गणेश मुर्ती विसर्जन करण्याकरीता शिरुर शहरात तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून मूर्तीदान कक्षाची ही स्थापना करण्यात आली असून विसर्जन घाट परिसराची स्वच्छतेसह त्याठिकाणच्या स्ट्रीट लाईट ची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली . नगरपरिषदेत गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत काळे यांनी सांगितले की गणेश शनिमंदिर विसर्जन घाट , दशक्रिया विधी घाट , रयत शाळेचे मैदानावरील कृत्रिम विसर्जन कुंभ या तीन ठिकाणी गणेश मुर्तीचे विसर्जन करणे करीता सोय करण्यात आलेली आहे. गणपती विसर्जनासाठी येणा-या गणेश भक्तांना गणेश मुर्ती विसर्जन कुंभामध्ये विसर्जित करण्यास व सोबत आणलेले निर्माल्य हे विसर्जन तलाव व कुंभाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पर्यावरण अनुकुल गणपती विर्सजन होणेसाठी व इतर सर्व कामासाठी नगरपरिषदे मार्फत टिमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहरातील विसर्जन मिरवणूक रस्त्याची पाहणी करुन रस्त्याची व स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करण्यात येत आहे. गणपती विसर्जन ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरातील मिरवणूक मार्गावरील राडारोड उचण्याबाबत संबंधित नागरिकांना सूचना देऊन साहित्य उचलण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नगरपरिषदेव्दारे विविध माध्यामाव्दारे मुर्तीदान करणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. विसर्जन स्थळी मुर्तीदान कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. जे नागरिक मुर्तीदान करणार आहेत त्या नागरिकांना परिषदे मार्फत पर्यावरणदुत पुरस्काचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . विसर्जन स्थळी नगरपरिषदे मार्फत नदीच्या किनारी बॅरिकेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भभवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागास तत्पर कार्यवाही साठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे . शिरुर शहरातील जास्तीत जास्त नागरिक यांनी नगरपरिषदेने गणपती बाप्पांचे विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव व कुंभामध्ये विसर्जन करावे व निर्माल्य नदीमध्ये टाकू नये असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राहूल पिसाळ , नगर रचना विभागाचे पकंज काकड , संजय बारवकर , उमेश शेळके , शैलेश जाधव , बाळसाहेब झोडगे , हाफीज बागवान , सोहेल शेख , स्वप्ननील रेड्डी आदी उपस्थित होते .