शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या रक्कमेचा अपहार करणारे आरोपीची ४१ लाख ५० हजार रुपये किमंतीची वाहने शिरूर पोलीसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे . याबाबत दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये भा.दं.वि.क. ४२०,४०९, ४६७,४६८,४७१, १२०(ब), ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . याबाबत संजयकुमार सखाराम मुंडे, वय ५६ वर्ष, रा.लेजर टाऊन, हडपसर, पुणे यांनी फिर्याद दिली होती . दि.३१/१२/२०१३ ते दि. २०/०२/२०२० या कालावधीमध्ये आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे या संस्थेमधील अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळून कट करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे या पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण १६,७०,५४,३६१/- रू.ची फसवणुक केली असल्याची फिर्यादी मुंडे यांनी केलेल्या ऑडीट मध्ये निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ कायदया अंतर्गत वरील गुन्हयातील आरोपी यांचे व त्यांचे फर्मचे नावे असलेले १) १५ लाख रू किमंतीचा एक लाल रंगाचा ट्रक तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीक्यु ६८८४ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले , आठ लाख रू.किमंतीचा एक पांढरे रंगाचा टेम्पो तीचा आरटीओ नं. एमएच १२ एनएक्स ८६३९ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले , आठ लाख रू. किमंतीचा एक पिवळया रंगाचा टेम्पो तीचा आरटीओ नं. एमएच १२ क्युडब्ल्यु ४५३७ ही मेघहंस हंसराज अॅन्ड सन्स फर्म चे (अभयकुमार चोरडीया, प्रविण चोरडीया व इतर २) यांचे नावेअसलेले , ५ लाख - रूकिमंतीचा एक पांढरे रंगाचा पिकअप तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीक्यु ६९३७ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले ,४,००,०००/- रू.चा पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती तीचा आरटीओ नं. एमएच १२ डब्ल्यु एक्स १११४ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले , ३०,०००/-रू. एक पांढरे रंगाची होंडा एक्टीव्हा स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ एच वाय ६१३२ ही प्रविण चंपालाल चोरडीया यांचे नावे असलेली , ३०,०००/- रू. एक पांढरे रगाची टीव्हीएस स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ एल क्यु ७५५२ ही प्रितम प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली , ४०,०००/- रू. एक ग्रे रंगाची होंडा स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ आरआर ६९९७ ही सविता अभयकुमार चोरडीया यांचे नावे असलेली , ५०,०००/- रू. एक काळया रंगाची टिव्हीएस जुपीटर स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीके ६५४२ ही अभयकुमार पोपटलाल चोरडीया यांचे नावे असलेली असा एकुण ४१,५०,०००/- रू किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोहवा नितीन सुद्रिक, पोहवा राहुल भवर, पोअ आकाश नेमाणे, पोअ विरेंद्र सुंबे, पोअ ज्ञानदेव गोरे यांनी केली .