उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला दिला मदतीचा हात. तसेच स्वतःच्या ताफ्यातील डॉक्टरला अपघात ग्रस्त व्यक्तीचा उपचार करण्याच्या दिल्या सूचना.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना. सर्किट हाऊस कडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना. संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वराचा व रिक्षाचा अपघात झाला. अजित दादा यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघात ग्रस्त व्यक्तीला धीर दिला व त्याची विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला तसेच अपघातग्रस्त यांच्या वर त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स मधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्या साठी सांगितले. व आपल्या पुढील कामासाठी अजितदादा रवाना झाले.