शिरुर दिनांक ( वार्ताहर) गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे सांगत विसर्जन मिरवणूकीत डीजे व लेझरचा वापर टाळावा असे आवाहन शिरुरचे पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले यांनी केले . गणोशोत्स्वाचा संदर्भात शिरुर तहसिल कार्यालयात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची बैठक पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती . ढोले यावेळी म्हणाले की उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे . उत्सवात उन्माद नको . विसर्जन मिरवणूकीत लेसर व डीजेचा वापर करु नये . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले की विसर्जन मिरवणुकीला देखावा सादर करताना विसर्जन मार्गाचा विचार करुन देखावाची उंची व रुंदी ठरवावी. पोलीस स्टेशनचा वतीने नियमांचे पालन न करणारा १६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे . एमईएसबीच्या आधिका-यांशी चर्चा करुन वीजेच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यात येईल . बैठकीत लोकशाही क्रांती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप ,भाजपचे उमेश शेळके , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , जयवंत साळुंखे , शोभना पाचंगे ,सुनील जाधव , श्यामकांत वर्पे यांनी सूचना मांडल्या . यावेळी विलास आंबेकर , राजू शेख , शशिकला काळे , डॉ . वैशाली साखरे , प्रियंका बंडगर , सविता बोरुडे , राणी कर्डिले , प्रीती बनसोडे, सोहेल शेख , संदिप कर्डिले , पदमराज कोळपकर ,बिभीषण मोहिते , नितीन काळे , तुकाराम सुतार , राजू भोसले , आशिष शिंदे , सोनाजी ससाणे , सतिश बागवे , शिवाजी पवार , प्रताप शेंडगे , महेश पठारे , प्रसाद लांडे , तुषार हिंगडे ,ललित पाटील , आशिष उबाळे सोमेश काळे , ओम जगताप , अमोल करंजुले ,गोरक्ष करंजुले , आशिष चव्हाण , रोहिणी खोडदे , सुवर्णा नळकांडे स्वाती वाघमारे , आदी यावेळी उपस्थित होते .