शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ चे दोन शिक्षकांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे . शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ५ चे मुख्याध्याप संतोष मधुकर चव्हाण यांना आदर्श मुख्याध्यापक तर भानुदास ज्ञानोबा हंबीर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ॲड . आमदार ॲड .अशोक पवार, शिरूर नगरपरिषदे सभागृह नेते प्रकाश धारीवाल, शिरुरच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, प्रशासन अधिकारी पद्मा दिंडे,नोटरी रविंद्र खांडरे यांनी चव्हाण व हंबीर यांचे अभिनंदन केले आहे .