शिरुर दिनांक ( वार्ताहर )पुणे नगर रोड चे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत होणारे काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी  जनता दल धर्मनिरपेक्षचे   प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिली आहे.

  या बाबतची माहिती देताना शेवाळे म्हणाले की यापूर्वी पुणे नगर रोडचे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी मार्फत करण्यात येणार होते. त्या बाबतचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला होता परंतु आता हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या मार्फत करणार असून याबाबतचा कारारनामा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जनता दल से. प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी या विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित ( IAS)यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर रोडचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली.पुणे - नगर चार पदरी रोड असून या रोडवर मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. या रोड वर रांजणगाव आंतराष्ट्रीय दर्जाची औद्वयोगिक वसाहत आहेत, यामुळे या रस्त्यावर वाहनाची प्रचंड वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे .यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत चालु करावे याची मागणी शेवाळे यांनी केली. यावर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीक्षित यांनी श्री.शेवाळे यांच्याशी बोलताना सांगितले की, पुणे नगर रोड महामंडळाकडे हस्तांतरण झाल्यावर लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे  दीक्षित यांनी सांगितले.