जालना (आप्पासाहेब गोरे)रेवगाव येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल & ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री गजानन पाटील वाळके (प्रदेशाध्यक्ष, मेस्को अर्थात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशन) यांनी रेवगाव येथील तरुणांनी स्पर्धा परिक्षा तथा उद्योजकतेकडे लक्ष केंद्रित करावे, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय, रेवगाव या वाचनालयासाठी स्पर्धा परिक्षेचे विविध पुस्तके / ग्रंथ खरेदी करण्यासाठी रू. 2000/- (रूपये दोन हजार) देणगी स्वरूपात दिले आहेत, तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक व्हावे, यासाठी *मी कसा घडलो* याविषयावर यशस्वी उद्योजक तथा प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करावे, असे प्रतिपादन केले. श्री गजानन पाटील वाळके हे नेहमीच शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असुन सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांच्या संस्थेचे रेवगाव येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल & ज्युनिअर कॉलेज अल्पावधीत नावारूपास आले असुन येथे केजी टु पीजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत. लवकरच वरिष्ठ महाविद्यालय व मुक्त विद्यापीठाचे ग्रामीण भागासाठी पुरक अभ्यासक्रम सुरू केले जातिल असे आश्वासन वाळके यांनी दिले. मा. गजानन पाटील वाळके यांचे दातृत्वातुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या अनेक युवक - युवतींना निश्चित फायदा होणार आहे. 

सदरील देणगी मा. रघुनाथ पा. गोल्डे व मा. संतोष मोहिते यांनी स्विकारून गजानन वाळके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपशिक्षणाधिकारी परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. मा. वाळके सरांचे कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय, रेवगाव तर्फे मनःपूर्वक आभार व खुप खुप धन्यवाद...! याप्रसंगी सरपंच वैशाली चव्हाण, रामभाऊ चव्हाण, चेअरमन सुभाष मोरे, संतोष महाजन, सचिन गोल्डे, त्रिंबक शेळके, भरत मोरे, संजु पाखरे, बाळु पाखरे, विठ्ठल गोल्डे, मोहन गोल्डे, सुनिता संजय पाखरे, संतोष शिंदे, मोहन जैस्वाल, हरीश गोल्डे, नारायण गोल्डे, आशिष पाखरे, गणेश गोल्डे, मुरली गोल्डे, अभय गायकवाड काशीनाथ गायकवाड ग्रंथपाल कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय रेवगाव . व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.