हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील वरखेडा गावचे कर्तुत्वान सरपंच गजानन रावजी सावंत यांची आज बैलपोळा व कर यांच्या यात्रा महोत्सवाचा सुवर्णयोग साधून श्री तीर्थक्षेत्र पावन वरखेडा नगरीमध्ये शनि महारुद्र देवाचे दर्शन घेऊन विकास कामाचा ध्यास घेऊन सरपंच व ग्रामविकास यासाठी झटणारी एकमेव संघटना म्हणजेच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या मध्ये प्रवेश घेऊन त्यांची डॉ. देवानंद शंकर गोरे तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र हिंगोली चे जिल्हा समन्वयक सरपंच डॉक्टर देवानंद गोरे व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तर वरखेडा नगरी व पंचक्रोशीतील नागरिक तसेच बऱ्याच गावचे आजी माजी सरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असून भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर उपस्थित बांधवांना गजानन सावंत यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर या निवडीबद्दल गावकरी तसेच पंचक्रोशीतील मान्यवर व भजनी मंडळ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर गावगाड्यातील प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात नूतन सेनगांव समन्वयक पदी निवड झाल्याने अनेकांनी इच्छा व्यक्त केले आहेत व निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक व मोलाचे स्वागत देखील करण्यात आली आहे अशी माहिती आज आज रोजी प्राप्त झाली आहे