औरंगाबाद (अप्पासाहेब गोरे)स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव निमित्त टाकळी कदीम ता. गंगापूर येथे गावकरी यांच्या वतीने मागील एका सप्ताह पासून विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. दि 8 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यात महिला मेळावा, महिला बचत गट यांना मार्गदर्शन, शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. भारत सरकारचा हर घर झेंडा हा उपक्रम यशवी पणे गावात राबण्यात आला, यात रोज सडा रांगोळी टाकून गावकरी सहभागी झाले.. या अमृतमोहत्सव च विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गावातील 1947 पूर्वी जन्म झालेले जेष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा. गावातील 40 जेष्ठांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या उपक्रमातून नव्या पिढी पुढे एक आदर्श निर्माण करण्याच काम गावाने केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावाच्या विद्यमान सरपंच सौ अल्काताई शिवाजीराव चंदेल होत्या. कार्यक्रम यशवी करण्यासाठी सदस्य शिवजीराव चंदेल, सीमाताई ठाले, माजी सरपंच राजू पुरहे, शाळा समिती अध्यक्ष श्री प्रकाश भवर व श्री पुडंलिक बनगे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गफ्फुर पठाण , नवनाथ पुरहे, जगदीश बढेकर, गणेश ठाले, ग्रामसेवक गवई मॅडम व तलाठी गणेश लोने गावातील तरुण मित्र मंडळ यांच सहकार्य लाभले.