शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मुलीच्या छेडछाडीच्या व चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भीति दाखवुन पंचवीस हजार रु.ची खंडणी उकळणा-या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे . 1) सुमित लक्ष्मण थोरात वय 32 वर्षे, (2) विशाल नवनाथ ढेसले वय 31 वर्षे, रा. रांजणगाव ग.ता. शिरुर, जि. पुणे यांना याप्रकरणी अटक केली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार १ संप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी 7.00 ते 08.30 वा.चे सुमारास रांजणगाव येथील भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये श्रीकांत तुकाराम शिंपले वय 25 वर्षे, मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे याना सुमित लक्ष्मण थोरात व प्रविण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेवुन काठीने मारहाण केली. व त्या ठिकाणी एका मुलीस बोलावुन घेवुन तु हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी देवुन 25,000/रु.च्या खंडणीची मागणी केली. व त्याचेकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम शिपलेना पाठविण्यास सांगीतली. सदरची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम त्याचे साथीदार विशाल नवनाथ ढेसले, व अभय रामटेके सर्व रा. रांजणगाव ग., ता. शिरुर, जि. पुणे यांचे मदतीने संगन मत करुन घेतली आहे. या प्रकरणी श्रीकांत शिंपले यांचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना समजताच त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत तात्काळ तपास पथकाचे मदतीने आरोपीचा शोध घेणे कामी पथक रवाना केले. घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळून आरोपींचा सहभाग निष्पन्न करुन आरोपी सुमित लक्ष्मण थोरात वय 32 वर्षे, (2) विशाल नवनाथ ढेसले वय 31 वर्षे, रा. रांजणगाव ग.ता. शिरुर, जि. पुणे यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांना ५ संप्टेंबर 2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनाविण्यात आली आहे . अटक आरोपीकडुन खंडणी स्वरुपामध्ये फिर्यादी कडुन घेतलेली 25,000 रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी प्रविण जगताप व अभय रामटेके यांचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभागाबाबत खात्री करुन पुढील अधिक तपास करण्यात येत आहे. यातील अटक आरोपी सुमित लक्ष्मण थोरात हा रांजणगाव येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे व त्याच्या पोलीसांशी ओळखी आहेत असे फिर्यादीस सांगुन त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती दाखवुन खंडणीची मागणी करत 25,000/रु. खंडणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असुन त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. हा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहाय्यक फौजदार सुभाष गारे, पो.हवा.विलास आंबेकर, पो.हवा. तेजस रासकर, पो.कॉ. उमेश कुतवळ, .पो.हवा. पांडुरंग साबळे यांनी केला सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.