शिरुर दिनांक ( वार्ताहर ) भटके विमुक्त दिनानिमित्ताने भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य आयोजित संवाद यात्रा शिरूर येथे मंगळवार दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते १.०० या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती वात्सल्यसिंधू फाउंडैशनच्या सुनंदा लंघे व उषा वाखारे यांनी दिली . मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे , शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे,तहसिलदार बाळासाहेब मस्के व भटके विमुक्त आदिवासी समूहातील महिला नेतृत्व महिला अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोबांरी समाज समावेशक संस्था शैला यादव अदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर अकोलाच्या रजनी पवार आदी उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाची सुरुवात बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन होणार असून मेळावा ठिकाण : शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते १.०० या वेळेत होणार असल्याचे वाखारे यांनी सांगितले .