शिरुर (वार्ताहर ) अष्टविनायकापैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील श्री . महागणपती मंदिरात बुधवार दिनांक ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या काळावधीत भाद्रपद गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ४ संप्टेंबर ते ८ सप्टेंबर पर्यत मंदिरात भाविकांना थेट मंदिराचा गाभा-यात  जावून महागणपतीचा मुर्तीस स्पर्श करुन दर्शन घेता येणार आहे . केवळ द्वारयात्रेचा काळात थेट गाभारात जावून भाविकांना दर्शन घेता येते . त्यामुळे या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते . बुधवार दि . ४ संप्टेंबर रोजी पूर्वद्वार यात्रे करिता श्रींची पालखी कर्डे येथील मांजराई ( दोनलाई ) कडे जाईल . यावेळी पाचुंदकर आळीचा मानकरी आहेत . गुरुवार दि. ५ संप्टेंबर रोजी श्रींची पालखी दक्षिणद्वार करिता निमगाव म्हाळुंगी येथील आसराई ( शिरसाई )कडे जाईल . यावेळी माळी आळीचा मान असणार आहे .मुक्तदार दर्शन पहाटे ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे . शुक्रवार दि . ६ संप्टेंबर रोजी पश्चिम द्वार असून श्रीची पालखी गणेगाव येथील ओझराई देवी कडे जाणार असून लांडे आळी मानकरी असणार आहेत . .मुक्तदार दर्शन पहाटे ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे . शनिवार दि. ७ संप्टेबर रोजी श्रींची पालखी उत्तरद्वारला असून ढोकसांगवी येथील मुक्ताई देवी कडे जाणार असून शेळके आळीचा मान राहणार आहे .यादिवशी मुक्तदार दर्शन पहाटे १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे . यादिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीच्या पालखीची मिरवणूक होणार असून ह . भ .प . अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे किर्तन होणार आहे . रविवार दिनांक ८ संप्टेंबर रोजी मुक्तदार दर्शन पहाटे ६ ते सकाळी १० वाजेपर्यत असणार आहे .सकाळी १० ते ११ यावेळेत श्रीच्या पालखीची मिरवणूक असणार असून दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे . सोमवार 9 संप्टेंबर रोजी सकाळी श्रींच्या पुढे भाविकांची दंडवते होतील दुपारी मोरेश्वर बुवा जोशी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे . मंगळवार दि १० संप्टेंबर रोजी मानकरांना बिदागीचे वाटप करण्यात येणार आहे .