शिरुर दिनांक ( वार्ताहर ) 28 ऑगस्ट 2024 रोजी मौजे आडगाव रंजे ता. वसमत जि. हिंगोली येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करीत असताना चाकु भोसकुन खुन करणेत आला. या घटनेचा निषेध करीत शिरुर तालुक्यातील तलाठ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन करत सदर घटनेचा निषेध केला आहे . शिरुर तालुका तलाठी संघातर्फे यासंदर्भातील निवेदन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे . निवेदनात म्हटले आहे की दिनांक 28/08/2024 रोजी मौजे आडगाव रंजे ता. वसमत जि. हिंगोली येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी श्री. संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करीत असताना चाकु भोसकुन खुन करणेत आला असुन महाराष्ट्र सारख्या राज्यात अश्या प्रकारे सरकारी कर्मचारी सोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदनीय व घृणास्पद असुन यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसुन येते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ निषेध करतो . या घटनेमुळे मयत तलाठी संतोष देवराव पवार यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाले असुन केवळ संशयामुळे त्यांचे कोणताही दोष नसताना आरोपीच्या मानसिकतेमुळेच त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असुन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा शिरुर चे एम .बी. बिराजदार ,रमेश घोडे , गणेश गोरखसिंग बिघोत. श्री दीपक गांगर्डे , पांडुरंग कोळगे , सतिश पलांडे ,आबासाहेब बाळासाहेब रुके , प्रशांत शेटे , जे . डी . धुरंधर आदीच्या सह्या आहेत