शिरूर दिनांक ( वार्ताहर ) पुणे नगर महामार्गावर न्हावरा फाटा , ता . शिरुर , जि. पुणे येथे वाहनाच्या धडकेत महिला मृत्युमुखी पडली आहे . पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ संतोष महाजन वय 21 वर्षे व्यवसाय अँम्ब्युलस चालक रा. महाजनमळा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे. यांनी फिर्याद दिली आहे . 26 ऑगस्ट 2024 रोजी सदरवाडी येथील न्हावरा फाटा जवळील कानिफनाथ मंदिर येथे अज्ञात वाहनाने ३० वर्षाच्या अनोळखी महिलेस धडक दिली .या महिलेचा अंगावर जांभळे रंगाचा कूर्ता आणी हिरवे रंगाचा स्वेटर आहे . वाहन चालक महिलेला धडक देवुन निघुन गेला . अज्ञात चालकाने स्वतःचे ताब्यातील वाहन बेदरकपणे हायगयीने अविचाराने भरधाव वेगात चालवून अपघात करून अपघाताची कोणतीही माहिती न देता निघून गेला असून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाऴे करीत आहेत .