शिरुर दिनांक ( वार्ताहर )आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर  शाळेच्या सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टी निमित्त  गोकुळ अवतरले होते .

आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर  येथील पूर्व प्राथमिक विभागाने अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. लहान मुले कृष्ण व मुली राधा तसेच सर्व माता पालक *देवकी* तर काही यशोदामैया च्या वेशभूषेत उपस्थित होत्या .सर्व शिक्षक वृदांनी आकर्षक अशी सजावट केली. त्यामध्ये गाय-वासरू, नटखट कृष्ण, नाचणारे मोर, बासरी, हंडी मोरपीस अशी आकर्षक सजावट करण्यात आली होती . कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या अश्विनी घारू  यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व माता पालक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी उत्साहत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली .  प्रीती सोनवणे,  सोनाली पवार, सुप्रिया रासकर , सविता मुलीक, शुभांगिनी शिंगवी, आसिया शेख,  शिल्पा गडकर,  रसिका मोरे आणि  अक्षदा अवचिते या शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले . सर्व चिमुकल्या बालगोपाळांनी दहीहंडी फोडली व प्रसादाचा आस्वाद घेतला. प्राचार्या आश्विनी घारू यांनी कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते व भगवतगीतेचे महत्व सांगून कार्यक्रमाची सांगता केली . शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे सदस्य धरमचंद फुलफगर  यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.