विभागीय उपायुक्त प्रदिप पवार , राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभाग औरंगाबाद, संतोष झगडे , अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क च्या विभाग (सिल्लोड) औरंगाबाद यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि. १५/०८/२०२२ स्वातंत्रदिना निमित्त कोरडा दिवस असल्याने रोजी सावरगाव शिवार, सावरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे हॉटेल लई भारी, सावरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे छापा असता त्या ठिकाणी सुनिल अर्जुन सोनवणे वय ३८ वर्षे, रा. सावरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद हा इसम टाटा कंपनीची इंडिका डिएलएस चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०४ सी.बी. ३३७२ मध्ये देशी, विदेशी व बिअर मद्याच्या ३७६ सिलबंद दारु बाटल्या बाळगून असतांना मिळून आला. त्याच्याकडे सदर मिळून आलेल्या मद्याबाबत कोणताही रितसर परवाना मिळून आला नाही. सदर वाहन व दारुसाठयासह आरोपी इसमाकडे एकूण रु. १५१३९०/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याचे विरुध्द निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क के विभाग (सिल्लोड) औरंगाबाद कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई निरीक्षक, एन.एस. डहाके, सहायक दुय्यम निरीक्षक प्रविण पुरी जवान सर्वश्री अमित नवगिरे, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने केली.