शिरुर दिनांक ( वार्ताहर ) श्री. स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट येथील श्री .स्वामी समर्थ महाराज यांच्या मुळ चर्म पादुका आगमन व दर्शन सोहळा गुरूवार दि. २२ ऑगस्ट रोजी दु. १:०० ते रात्री ८:०० पर्यंत स्वामी छाया बिल्डिंग, विठ्ठल नगर, शिरूर जि.पुणे येथे होणार असल्याची माहिती स्वामी भक्त व रामकमल कन्स्ट्रक्शनचे प्रमुख विठ्ठल रामचंद्र खोडदे यांनी दिली . हा कार्यक्रम श्री .वेदमुर्ती नितीन प्रभाकर पुजारी चोळप्पा महाराज यांचे ५ वे वंशज यांच्या व सेवेकरी यांच्या उपस्थितीत होणार असून मोठ्या संख्येने स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल खोडदे यांनी केले आहे .