पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील चुंबळी फाटा ते माजरसुबा रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असतांना रस्ते ओलांडणे विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांन साठी कठीण झाले आहे. वेगाने येणारी वाहने चुकवित विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याने पालकांचाच जीव टांगणीला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रश्नी कोणतेही प्रशासन लक्ष देत नसून आज माजरसुबा रस्त्यावरील बामदळे वस्ती येते भीषण आपघात होऊन सहा जनाचा मृत्यू झाला आहे या आधी ही ह्या रस्त्यावर अनेक आपघात झाले असून अनेक जण मरण पावले आहे.प्रशासनाने रस्त्यांवर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी वारंवार केली जात आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मात्र प्रशासन ह्याकडे लक्ष द्यायना पाटोदा शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या रस्त्यांमध्ये चुंबळी फाटा ते छञपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच छञपती शिवाजी महाराज चौक ते
माजरसुबा रोड असून या रस्त्या लगतच शाळा कॉलेज व मुख्य बाजार पेठ असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता ओलडांताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.विद्यार्थी गटागटाने एकत्र येतात आणि मग रस्ता ओलांडतात पाटोद्यातून जात असलेल्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत.प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पहात आहे,असा सवाल नागरिक उपस्थित करत असून पाटोदा शहरातील वाढते आपघात रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्यात यावे आशी मागणी थेरला गावचे माजी सरपंच तथा प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब राख यांनी केली आहे