फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील श्री.रामेश्वर विद्यालयाचे स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण गेल्या आठ वर्षांपासून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात येते.

ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.

या वर्षीचे स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून पहिला क्रमांक मिळवलेला विद्यार्थी अभिषेक गोकुळदास गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष विकास शेषराव पाटील गायकवाड, सरपंच सौ पुष्पाताई अरुण गायकवाड, बाबुराव काशिनाथ पाटील गायकवाड, लोहगड नांद्रा माजी उपसरपंच शेकू पाटील बोडखे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील बोराडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत पाटील गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील कावळे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन त्रिंबक पाटील शिंदे, माजी सरपंच एकनाथ नवतुरे, शालेय समिती सदस्य आबासाहेब वाडकर, गायनाचार्य गणेश आप्पा गायकवाड, सांडू आप्पा गायकवाड, रामेश्वर थोरात, पोलीस पाटील लताताई कवाळे, आशा वर्कर लताबाई गायकवाड, शाहीर एकनाथ गायकवाड, सहशिक्षक अभिमान पवार सर, कैलास व्यवहारे सर, गुलाब मेश्राम सर, श्री विजय नवतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण मेमाणे सर यांनी केले. अध्यक्षीय समारोप शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड यांनी केला, तर आभार क्रीडा शिक्षक संतराम मोरे यांनी केले.