शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरातील रम्यनगरी परिसरातील २२ वर्ष वयाची महिला मिसिंग झाली असून या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग दाखल करण्यात आले आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहबाज निसार बागवान वय २४ वर्ष रा . रम्यनगरी शिरूर ता शिरूर जिल्हा पुणे यांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनला खबर दिली आहे गौरी अरबाज बागवान वय २२ वर्ष रा रम्यनगरी शिरूर ता शिरूर जि पुणे रम्यनगरी येथील रहाते घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या असून अदयाप पर्यंत घरी आल्या नाहीत अशी खबर पोलीस स्टेशनला गौरी बागवान यांचे दीराने दिली आहे . यासंदर्भात पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आगलावे करत आहे :- चौकट-: मागील काही दिवसापासून शिरुर शहर आणि परिसरातून मिसिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे . यापूर्वी रामलिंग येथून दोन , सोनार आळीतून एक व बागवान नगर मधून एक जण मिसिंग झाले आहेत .