शिरुर दिनांक ( वार्ताहर )अविष्कार संघटनेचा वतीने देण्यात येणाराराज्यस्तरीय राजमाता जिजाउ पुरस्कार तर्डोबावाडीच्या अंगणवाडीसेविका चंद्रकला कांतीलाल कर्डिले यांना  देण्यात आला . यावेळी आविष्कार फाउंडेशन, इंडिया चे संस्थापक संजय पवार , यशदा पुणेचे मास्टर ट्रेनर विवेक गुरव, प्रसिध्द लेखक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे , कर्मविरायण चित्रपटाचे लेखक धनंजय भावलेकर , व्यवसायिक फुलचंद चाटे , अविष्कार पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश चौधरी , उपाध्यक्ष प्रा . विलास आंबेकर , आविष्कार फाउंडेशन, इंडिया चे पुणे शहराध्यक्ष प्रा .श्रीकांत जगताप आदी यावेळी उपस्थित होते . कर्डिले या मागील १५ वर्षापासून तर्डोबावाडीच्या थापेमळा येथील अंगणवाडीत सेविका असून शैक्षणिक कार्या बरोबर परिसरातील सामाजिक कार्यात सहभागी असतात . त्याच बरोबर आरोग्या संदर्भातील उपक्रमात ही सहभागी होत असतात . त्याचे पती कांतीलाल कर्डिले हे तर्डोबावाडीच्या ग्रामपंचायतीत कर्मचारी आहेत . कर्डिले यांना पुणे येथील कार्यक्रमात राजमाता जिजाउ पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह , शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते .