शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड अमित विलासराव खेडकर यांची तर खजिनदारपदी  ॲड . प्रणव हरिश्चंद्र घाडगे यांची निवड झाली आहे नुकतीच सन 2024 - 25 सालच्या शिरूर तालुका वकील संघाच्या कार्यकारिणीची वार्षिक निवडणूक पार पडली सदर निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी  ॲड . अमित विलासराव खेडकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच पुरुष उपाध्यक्ष पदी ॲड .यमराज शिंदे हे निवडून आले असून, सचिव पदासाठी ॲड. सागर जठार हे निवडून आले. महिला उपाध्यक्षपदी ॲड . वर्षाराणी वडगावकर यांची बिनविरोध निवड झाली तसेच खजिनदार पदी ॲड. प्रणव घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड. पवन पवार ॲड .सागर जोरी, ॲड . विशाल कांबळे, ॲड . पल्लवी येवले, ॲड. लता गायकवाड यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणुकीदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. भागवत दिघे, ॲड. दिलीप कांबळे, ॲड . रंजना घाडगे यांनी काम पाहिले. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्याकरिता ॲड शिरीष भैय्या लोळगे, ॲड. संजय वाखारे, ॲड . एस. वाय गायकवाड, ॲड. वसंतराव उबाळे, ॲड. शांताराम दोरगे, ॲड . वसंत कोरेकर, ॲड . दिलीप गिरमकर, ॲड . किरण आंबेकर, ॲड . निवृत्ती वाखारे,ॲड . सुहास ढमढेरे, ॲड . महेश ढमढेरे, ॲड. भोलेनाथ पडवळ, ॲड. रवींद्र खांडरे, यांनी मोलाचे सहकार्य केले. मावळते अध्यक्ष ॲड . परेश थोरात यांनी व त्यांचे कार्यकारिणीने पदभार नवीन अध्यक्ष ॲड . अमित खेडकर व त्यांचे कार्यकारणी कडे सोपविला आहे.