शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर येथील बाबूराव नगर येथील १७ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे . रतन बुधे ढोली वय 17 वर्ष रा बाबुराव नगर, गंगा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, शिरूर ता शिरूर जि पुणे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बुधे ढोली वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी रा पाचर्णे मळा, शिरूर ता शिरूर, जि. पुणे यांनी पोलीस ठाण्यास खबर दिली आहे .  गणेश ढोली पाचर्णे मळा येथील त्यांच्या घरी असतांना त्याना छोटा भाउ लक्ष्मण याने फोन केला व सांगीतले की, रतन बुधे ढोली वय १७ वर्षे याने आपले राहते घरी पत्रा शेड मधे फाशी घेतली आहे . त्यानंतर गणेश हे बाबूराव नगर येथे आले असता त्यांचा भाउ राहत असलेल्या पत्रा शेड समोर त्यांचे नातेवाईक जमा झालेले दिसले व भाउ रतन बुधे ढोली वय १७ वर्षे हा खाली झोपलेला दिसला तेव्हा त्यांना समजले की, त्यांचा भाउ रतन बुधे ढोली वय १७ वर्षे याने राहते घराचे पत्राचे अँगलला साडीचे सहाय्याने फाशी घेतली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे . या प्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक टेंगले करीत आहे .