आझादिका अमृत मोहोत्सव कार्यक्रमा अंतर्गत कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश दिले. असून या सप्ताहात औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष व माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या नेतृत्वात फुलंब्री विधानसभा मतदार संघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदरील पदयात्रेला लाडसावंगी येथील हुतात्मा स्मारका वरून हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेची सुरवात करण्यात आली असून

औरंगाबाद तालुक्यात 3 दिवसात 75 किलोमीटर प्रवास करणार आहे.फुलंब्री तालुक्यातील गणोरी, निधोना, वडोदबाजार, कोलते टाकली, धामणगाव, पाल मार्गे पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचे समारोप रविवार रोजी फुलंब्री येथे करण्यात आला सदरील पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी महिलांच्या वतीने तिरंगा झेंड्याचे औक्षण करण्यात आले, तर पदयात्रा दरम्यान प्रत्येक गावातील महापुरुषाच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला,त्याच प्रमाणे प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक आणि सैन्यात गेलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

 माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे प्रदेश कमिटी सदस्य सुदाम मते, तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, युवक चे जिल्हाध्यक्ष वरून पाथरीकर, युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मार्केट कमिटी सदस्य विठ्ठल लुटे,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुनीता मारक,माजी सभापती कचरू मैंद,

 सदाशिव विटेकर, पुंडलिक जंगले, पिंपळगावचे सरपंच अंबादास गायके, संतोष मेटे, पुरुषोत्तम गाडेकर, रामेशोर गाडेकर, पंढरीनाथ जाधव, मुकेश चव्हाण, लहू मानकापे, यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती