शिरूर दिनांक ( वार्ताहर ) सूनेशी झालेल्या प्रापंचिक वादाच्या कारणावरुन केलेल्या जबर मारहाणीत वसंत दिलीप भोसले वय 43 वर्ष रा. पाण्याची टाकीजवळ शिरूर. ता .शिरूर जि .पुणे हे मृत पावले . याप्रकरणी तीन जणांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात भोसले यांची मुलगी रेहाना मेहबूब सय्यद वय 33 रा उबाळे नगर वाघोली ता. हवेली ,जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे . दि 01 ऑगस्ट 2024 रोजी २ वाजण्याचा सुमारास शिरूर येथील होलमिल बेकरी जवळ डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले वय 43 वर्ष रा पाण्याचे टाकी जवळ शिरूर ता. शिरूर जि पुणे यांना त्यांची सून अंजली रुवल काळे हिचे सोबत झालेल्या प्रापंचिक वादाच्या कारणावरून 1)नागरेष बाजीराव काळे 2) राजेश बाजीराव काळे 3) निघु बाजीराव काळे सर्व रा. पाण्याची टाकी जवळ ता शिरूर जि पुणे यांनी कोयता उलटा करून बोथट बाजू कडून कोयत्याने छातीत पायावर मारून डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली. त्या मारहाणीत वसंत भोसले हे ५ ऑगस्ट रोजी मरण पावले . याप्रकरणी 1) नागरेश बाजीराव काळे 2) राजेश बाजीराव काळे 3) निघु बाजीराव काळे सर्व रा. पाण्याची टाकी जवळ ता शिरूर जि पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उगले करीत आहेत .