शिरुर ( वार्ताहर ) शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर ६ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे . ०६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा पंचायत समिती शिरुर येथील छत्रपती संभाजी सभागृहार होणार आहे . सदर शिबीरामध्ये दिव्यांगांना सेतू सुविधा केंद्रातून दिले जाणारे सर्व आवश्यक दाखले, संजय गांधी योजनेचा लाभ, आरोग्य तपासणी, यु डी आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन, पंचायत समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना यांचा लाभ देण्यात येणार आहे. तरी सदर शिबीराचे शिरुर तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार म्हस्के यांनी केले आहे .