शिरूर दिनांक ( वार्ताहर ) हप्ता न दिल्याचा कारणांवरुन ट्रकचालकास मारहाण शिवीगाळ व दमदाटी व ट्रकचे नूकसान केल्या प्रकरणी ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश बाळासो महाडीक वय 24 धंदा - व्यवसाय रा. करडे ता. शिरूर यांनी फिर्याद दिली आहे . 29 जुलै 2024 रोजी दुपारी दीडच्या सुमारास करडे गावचे हददीतील एस. व्ही. एस. कंपनी येथील किरण रोडे याचे बंद टपरीजवळ महाडिक त्यांचे कार मधुन जात असताना अभिषेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांचे बरोबर एक अनोळखी मुलगा यानी त्याचेजवळील पल्सर मोटाररसायकल आडवी मारून महाडिक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला .परंतु महाडिक तेथून कार घेवून पळून गेले. नंतर दुपारी २ च्या सुमारास समाधान चौक, करडे ता. शिरूर जि. पुणे येथे महाडिक यांनी मुरूम टाकण्या करीता महीन्याला 15 हजार रूपये हप्ता न, दिल्याचे कारणावरून १) अभिषेक मिसाळ 2) संकेत महामुनी 3) बाला शिंदे सर्व रा. शिरूर 4) शुभम पुर्ण नाव पत्ता माहीत नाही 5) नवनाथ कलींदर, 6) टिनु शेळके व 7) रोहन पंचमुख सर्व रा. राजणगाव ता. शिरूर पुणे ८) सुरज पाडळे रा. सोनेसांगवी ता. शिरूर पुणे यानी महाडिक यांचा हायवा ट्रक न. एम.एच .- 12 यु.एम. - 9879 अडवुन चालक जावेद हमीद शेख यास हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून त्यांचे हातातील लाकडी दांडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले असल्याची फिर्याद दिली असुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत .