पाबळ ता. शिरूर येथील सह परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना चोवीस तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पाबळ ता. शिरूर येथील बेन वस्ती परिसरातील नवनाथ चौधरी यांच्या गोठ्यातील दोन गाय नुकत्याच चोरीला गेल्या होत्या, सदर जनावरे चोरणाऱ्या आरोपींचा शोध शिक्रापूर पोलीस घेत असताना पोलीस जनावरांच्या बाजारांत माहिती घेत होते असताना सदर जनावरे काष्टी बाजारामध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक गणेश सुतार यांना मिळाली, त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, अनिल ढेकणे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, गणेश सुतार, पोलीस शिपाई विशाल देशमुख, राहुल वाघमोडे यांनी काष्टी बाजारामध्ये जाऊन सापळा लावला असता त्यांना पाबळ येथून चोरीला गेलेल्या दोन गाय विक्रीसाठी आलेले दोघे दिसून आले दरम्यान पोलिसांच्या पथकाने संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे वय २२ वर्षे, अमीर साहेबराव घाडगे वय २१ वर्षे व दर्शन भीमराव धोत्रे वय २१ वर्षे तिघे रा. लाडबा वस्ती केसनंद ता. हवेली जि. पुणे यांना चोरीच्या जनावरांसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी केंदूर येथून सुद्धा तीन शेळ्या चोरल्या असल्याची कबुली दिली तिघांना देखील पोलिसांनी अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार हे करत आहे.