शिरूर दिनांक ( वार्ताहर ) अज्ञात चोरट्याने गोलेगाव रोड वरील कृष्णाई हाईटचा पार्किंग मधून मोटारसायकल चोरुन नेली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव प्रभु वाणी रा . गोलेगाव रोड कृष्णाई हाईट प्लॉट नं ३०४ शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे . वाणी यांची गोलेगाव रोड वरील कृष्णाई हाईट चे पार्कीग येथे पार्कीग केलेली स्पेल्डर कंपनीची मोटार सायकल नंबर एम एच ३७ ए ए ९७९७ तिचा चॅसी नं. MBLHAW123LHH35194 व तिचा इंजिन नंबर HA11EYLHH38164 अज्ञात चोरटयान चोरून नेली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत .