शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने मलकापूर ते शाहुवाडी अशी " शाहुवाडी दौड ” संपन्न झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या दौड चे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. शाहुवाडी दौड मध्ये शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेवून मलकापूर ते शाहुवाडी हे अंतर पार केले. या शाहुवाडी दौड मुळे शाहुवाडी पोलिसांचा एक आगळा उपक्रम तालुकावासीयांना पहायला मिळाला.