शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर व तालुका शिवसेनेचा वतीने शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त छ्त्रीचे वाटप करण्यात आले .विशेष मुलींना खाउवाटप करण्यात आले . यावेळी बोलताना शहरप्रमुख माजी नगरसेवक संजय देशमुख म्हणाले की कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रची कुटुंबप्रमुख म्हणून काम केले . शिवसेना पक्षाला तळागाळात पोहचविण्याचे काम केले . आगामी काळात शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकाविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला . तालुकाप्रमुख पोपटराव शेलार यांनी शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर तालुक्यात वृक्षारोपन सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले . यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक खूशाल गाडे , महादेव कडाळे , माजी उपसरपंच संभाजी कर्डिले , नाना फलके , सुनील चौधरी , राजेंद्र चोपडा , संतोष पवार  ,पप्पु गव्हाणे , राकेश बोरा आदी उपस्थित होते .

Sponsored

The Silver Spoon - Hotel & Restaurant Bundi (Raj)

AC Room, AC Restaurant, AC Meeting Area Facility Available