शिरुर दिनांक ( वार्ताहर ) अज्ञात चोरट्यांने मंदिराचे कुलुप तोडून दागिने व साउंड सिस्टीम मशीन असा ३४ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबाजी ज्ञानेश्वर नरवडे वय 38 वर्षे धंदा शेती रा. संविदने ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे . संविदने ता. शिरूर येथील श्री. काळुबाई मंदीराच्या टेकडीवरील काळुबाई मंदीर येथे अज्ञात चोरटयाने मंदीराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन मंदीरात प्रवेश केला व मंदीरातील साउंड सिस्टीम व सोन्याचे दागीने चोरून नेले आहेत अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर सुनील उगले करीत आहेत .

Sponsored

रणजीत निवास - हेरिटेज वेडिंग रिसोर्ट - बूंदी राजस्थान

रणजीत निवास - हेरिटेज वेडिंग रिसोर्ट - बूंदी राजस्थान दिवाली स्पेशल ऑफर - 1,75 ,000 प्रति दिन - ऑफर 15 अक्टूबर से 30 अक्टूबर 2024 तक