शिरुर दिनांक ( वार्ताहर ) - भारत माता कि जय, वंदे मातरमच्या जयघोष करीत कारगील युध्दात प्रत्यक्ष युध्दभूमीवर पराक्रम गाजविणारे पाषाणवाडी ( घावटे मळा ) शिरूर येथील सुपुत्र महादेव घावटे यांच्या विशेष सन्मान कारगील विजय दिनानिमित्त त्याच्या घरी जावून डेक्कन एज्युकेशन स्कूल इंग्लिश मिडीयम शिरूर यांच्या वतीने करण्यात आला. या सत्काराने भारावेल्या घावटे यांनी कारगिल युद्धभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव कथन केले. आज सकाळी स्कूलचे विद्यार्थी पाषाणवाडी या ठिकाणी राहत असेलल्या घावटे यांच्या घरी पोहोचले. त्याच्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनीनी महादेव घावटे व त्यांच्या पत्नी नीता घावटे यांचे औक्षण केले. त्यानतंर त्यांना पेढे भरवले व देशभक्तीपर पुस्तके , शाल, गुलाबाची फुले देवून त्याच्या सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व वंदे मातारमच्या जयघोष केला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना व त्यांच्या प्रश्नांनाची उत्तरे देताना घावटे म्हणाले की कारगीलच्या युध्द भूमीवर लढताना एका गोळी पायाला गुडघा खाली गोळी चाटून गेली . पण देशप्रेम, लढण्याची जिद्द व आपण जिंकणारच हा आत्मविश्वास व यामुळेच युध्दभूमीवर लढत राहीलो आणि शेवटी आपला विजय झाला आणि या विजयात सहभागी होता आले आणि २६ जुलैला तिरंगा झेंडा फडकातना पाहता आला याचा अभिमान आणि आनंद असल्याची भावना कारगीलच्या युध्दातील सहभागी शिरुर येथील पाषाणवाडी घावटेमळातील सैनिक महादेव घावटे यांनी व्यक्त केली . पाषाणवाडीतील महादेव घावटे हे कारगील युध्दाचा वेळेस २० मे ते २६ जुलै व नंतर १ महिन्या युध्दभूमीवर होते . कारगिल युध्दाचा थरार व प्रत्यक्ष युध्द भूमीवरील अनुभव याची माहिती घेताना प्रत्यक्ष आपण युध्दभूमीवरच असल्याची अनूभूती विद्यार्थ्याना आली . आपले अनुभव सांगताना घावटे यांनी सांगितले की इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्या नंतर सैन्यदलात भरती झालो .सैनिक होण्याचे लहानपाणापासून स्वप्न होते. बेळगाव मध्ये ट्रेनिंग पूर्ण केले . त्यानंतर पहिली पोस्टिंग थेट जम्मू मध्ये झाली. त्यानंतर राजौरी, पूंझ , श्रीनगर येथे काम केले . कारगिल युध्द सुरु होण्यापूर्वी मी उरी सेक्टरला कार्यरत होतो .युध्द सुरु झाल्यावर आमच्या बटालियनाला थेट कारगील युध्दभूमीवर पाठवण्यात आले .३० मे ते २६ जुलै व २६ जुलै नंतर पुढील एक महिन्या कारगील युध्द भुमीवर होतो असे घावटे यांनी सांगितले . या काळात घरच्यांशी संपर्क होत नव्हता . युध्द लढताना मोठ्या जोष आम्हा सर्व सैनिकामध्ये होता . आता पर्यत भारतीय सैनिकांनी सर्व युध्दात विजय मिळविलेला आहे. त्याच बरोबर सर्व देशाला विश्वास होता की आम्ही भारतीय सैनिक जिंकणार आहोत असे घावटे यांनी सांगितले . कारगील युध्द भूमीत डोंगर व द-या आहेत . शक्यतो युध्द हे रात्रीच्या वेळेस चालायचे. जेवण्यासाठी हेलिकॅप्टर मधून फूडपॅकेट उपलब्ध व्हायची . युध्दाचा वेळेस आपल्या समवेतील १७ जणांना लढताना वीरमरण प्राप्त झाल्याचे सांगताना त्यांच्या हुंदका दाटून आला . १७ हजार फुट उंचीवरील या युध्दभूमीवरील या युध्दाकडे जगभरातील सर्व देशांचे लक्ष लागलेले होते . कारगील युध्द भूमीवर लढताना एका गोळी पायाला गुडघा खाली चाटून गेली. जखम झाली पण देशप्रेम, लढण्याची जिद्द व आपण जिंकणारच हा आत्मविश्वास व यामुळेच युध्दभूमीवर लढत राहीलो आणि शेवटी आपला विजय झाला आणि या विजयात सहभागी होता आले आणि २६ जुलैला तिरंगा झेंडा फडकातना पाहता आला याचा अभिमान आणि आनंद असल्याची भावना व्यक्त करताना घावटे यांचे डोळे पाणावले देशासाठी लढण्याची संधी मिळाल्याचे ही ते म्हणाले . युध्द संपून विजयी झाल्यावर शिरुरकरांनी व आई सुभद्राबाई यांनी केलेल्या स्वागताने भारावून गेलो होतो असे ही त्यांनी सांगितले सैन्यदलात मुले व मुली दोन्ही जावू शकतात असे सांगून सैन्यदलात जाण्याकरीता शरीर तंदुरुस्त असले पाहीजे .त्याकरीता नियमित व्यायाम , योग्य आहार , चांगल्या सवयी व शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी सैन्य दलात सहभागी व्हावे असे आवाहन केले . डेक्कन एज्युकेशन स्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूरचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार म्हणाले की सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी असून कारगील युद्धातील सहभाग घेतलेले घावटे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला हा विद्यार्थ्यांचा आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग आहे . कारगील युध्दा बाबतची माहिती ओंकार यांनी दिली. त्याच बरोबर शाळेच्या वतीने सैनिकच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी एस टी महामंडळातील सेवानिवृत्त आधिकारी प्रदीप कुलकर्णी , प्रसिध्द व्यापारी सतीश मुथ्था महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ , शिक्षिका सुनिता सरोदे , रत्नमाला महाजन , चंद्रकांत झांजे , आदी उपस्थित होते .